भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजी बरवें झालें । माझें माहेर भेटलें

aji baraven jhalen | majhen maher bhetalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आजी बरवें झालें । माझें माहेर भेटलें ॥१॥ डोळां देखिले सज्जन । निवारला भाग सीण ॥ध्रु.॥ धन्य झालों आतां । क्षेम देऊनियां संतां ॥२॥ इच्छेचें पावलों । तुका म्हणे धन्य झालों॥३॥