भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकांची स्तुति आम्हां ब्रम्हहत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा

anikanchi stuti amhan bramhahatya | eka vanchuni tya panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणिकांची स्तुति आम्हां ब्रम्हहत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥१॥ आम्हां विष्णुदासां एकविध भाव । न म्हणों या देव आणिकांसि ॥ध्रु.॥ शतखंड माझी होईल रसना । जरी या वचना पालटेन ॥२॥ तुका म्हणे मज आणिका संकल्पें । अवघीं च पापें घडतील ॥३॥