भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिलें सेवटा । आतां कामा नये फांटा

anilen sevata | atan kama naye phanta

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणिलें सेवटा । आतां कामा नये फांटा ॥१॥ मज आपुलेंसें म्हणा । उपरि या नारायणा ॥ध्रु.॥ वेचियेली वाणी । युक्ती अवघी चरणीं ॥२॥ तुका धरी पाय । क्षमा करवूनि अन्याय ॥३॥