भजनी मालिका
← भजनांकडे परत

आठवूंचि नेंदी आवडी आणीक । भरूनियां लोक तिन्ही राहे

athavunchi nendi avadi anik | bharuniyan lok tinhi rahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आठवूंचि नेंदी आवडी आणीक । भरूनियां लोक तिन्ही राहे ॥१॥ मन धांवे तेथें तिचें चि दुभतें । संपूर्ण आइतें सर्वकाळ ॥ध्रु.॥ न लगे वोळावीं इंद्रियें धांवतां । ठाव नाहीं रिता उरों दिला ॥२॥ तुका म्हणे समपाउलाचा खुंट । केला बळकट हालों नेदी ॥३॥