भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकांसी तारी ऐसा नाहीं कोणी । धड तें नासोनि भलता टाकी

anikansi tari aisa nahin koni | dhad ten nasoni bhalata taki

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणिकांसी तारी ऐसा नाहीं कोणी । धड तें नासोनि भलता टाकी ॥१॥ सोनें शुद्ध होतें अविट तें घरीं । नासिलें सोनारीं अळंकारीं ॥ध्रु.॥ ओल शुद्ध काळी काळें जिरें बीज । कैंचें लागे निज हाता तेथें ॥२॥ एक गहू करिती अनेक प्रकार । सांजा दिवसीं क्षीर घुगरिया ॥३॥ तुका म्हणे विषा रुचि एका हातीं । पाधानी नासिती नवनीत ॥४॥