भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकांची सेवा करावी शरीरें । तीं येथें उत्तरे कोरडीं च

anikanchi seva karavi shariren | tin yethen uttare koradin cha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणिकांची सेवा करावी शरीरें । तीं येथें उत्तरे कोरडीं च ॥१॥ ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा सेवकाच्या ॥ध्रु.॥ आणिकांचे देणें काळीं पोट भरे । येथील न सरे कल्पांतीं ही ॥२॥ आणिकांचे भेटी आडकाठी पडे । येथें तें न घडे वचन ही ॥३॥ आणिकें दंडिती चुकलिया सेवा । येथें सोस हेवा दोन्ही नाहीं ॥४॥ तुका म्हणे करी आपणासारिखें । उद्धरी पारिखें उंच निंच ॥५॥