भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदुःख दोष अंगीं लागे

anikanchya ghaten manitan santosh | sukhaduhkh dosh angin lage

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदुःख दोष अंगीं लागे ॥१॥ ऐसें मनीं वाहूं नयेती संकल्प । करूं नये पाप भांडवल ॥ध्रु.॥ किल्मीशाची चित्तीं राहाते कांचणी । अंगी ते जोडोनी ठाव जाळी ॥२॥ तुका म्हणे कोपे घडे पुण्यक्षय । होणार तें होय प्रारब्धें चि ॥३॥