भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजी दिवस झाला । धन्य सोनियाचा भला

aji divas jhala | dhanya soniyacha bhala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आजी दिवस झाला । धन्य सोनियाचा भला ॥१॥ झालें संताचे पंगती । बरवें भोजन निगुती ॥ध्रु.॥ रामकृष्णनामें । बरवीं मोहियेलीं प्रेमें ॥२॥ तुका म्हणे आला । चवी रसाळ हा काला ॥३॥