भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां केशीराजा हे चि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें

atan keshiraja he chi vinavani | mastak charanin thevitasen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां केशीराजा हे चि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ देह असो माझा भलतिये ठायीं । चित्त तुझ्या पायीं असों द्यावें ॥ध्रु.॥ काळाचें खंडण घडावें चिंतन । तनमनधन विन्मुख ता ॥२॥ कफवातपित्त देहअवसानीं । ठेवावीं वारूनि दुरितें हीं ॥३॥ सावध तों माझीं इंद्रियें सकळें । दिलीं एका वेळे हाक आधीं ॥४॥ तुका म्हणे तूं या सकळांचा जनिता । येथें ऐक्यता सकळांसी ॥५॥