भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां जावें पंढरीसी । दंडवत विठोबासी

atan javen pandharisi | dandavat vithobasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आतां जावें पंढरीसी । दंडवत विठोबासी ॥१॥ जेथें चंद्रभागेचिया तिरीं । आम्ही नाचों पंढरपुरीं ॥ध्रु.॥ जेथें संतांची दाटणी । त्याचें घेऊं पायवणी ॥२॥ तुका म्हणे आम्ही बळी । जीव दिधला पायां तळीं ॥३॥