भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजि ओस अमरावती । काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला

aji os amaravati | kala pahavaya yeti | dev visarati | dehabhav apula

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आजि ओस अमरावती । काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला ॥१॥ आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी । तटस्थ त्या ध्यानीं । गाई जाल्या श्वापदें ॥ध्रु.॥ जें या देवांचें दैवत । उभें आहे या रंगांत । गोपाळांसहित । क्रीडा करी कान्होबा ॥२॥ जया सुखाची शिराणी । तीच पाऊले मेदिनी । तुका म्हणे मुनी । धुंडितांही न लभती ॥३॥