भजनी मालिका
← भजनांकडे परत

आचरे दोष न धरी धाक । परीपाक दुःखाचा

achare dosh na dhari dhak | paripak duhkhacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आचरे दोष न धरी धाक । परीपाक दुःखाचा ॥१॥ चांडाळ तो दुराचारी । अंगीकारी कोण त्या ॥ध्रु.॥ नव्हे संतान वोसघर । अंधकार कुळासी ॥२॥ तुका म्हणे त्याचें दान । घेतां पतन दुःखासी ॥३॥