भजनी मालिका
← भजनांकडे परत

आजिवरी होतों संसाराचे हातीं । आतां ऐसें चित्तीं उपजलें

ajivari hoton sansarache hatin | atan aisen chittin upajalen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आजिवरी होतों संसाराचे हातीं । आतां ऐसें चित्तीं उपजलें ॥१॥ तुला शरणागत व्हावें नारायणा । अंगीकारा दिना आपुलिया ॥ध्रु.॥ विसरलों काम याजसाठीं धंदा । सकळ गोविंदा माझें तुझें ॥२॥ तुका म्हणे विज्ञापना परिसावी । आवडी हे जीवीं झाली तैसी ॥३॥