भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा

antaricha bhav janoniya guj | taise kele kaj panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥१॥ घातले वचन न पडेचि खाली । तू आह्मा माउली अनाथांची ॥ध्रु.॥ मज याचकाची पुरवावी आशा । पंढरीनिवासा मायबापा ॥२॥ नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥३॥ तुका म्हणे आतां केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥४॥