भजनी मालिका
← भजनांकडे परत

अझुनि कां थीर पोरा न म्हणसी किर । धरुनियां धीर लाजे बुर निघाला

ajhuni kan thir pora na mhanasi kir | dharuniyan dhir laje bur nighala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अझुनि कां थीर पोरा न म्हणसी किर । धरुनियां धीर लाजे बुर निघाला ॥१॥ मोकळा होतासि कां रे पडिलासि डाई । वरीलांचा भार आतां उतरेसा नाहीं ॥ध्रु.॥ मेळवूनि मेळा एकाएकीं दिली मिठी । कवळिलें एक बहु बैसविलीं पाठीं ॥२॥ तळील तें वरी वरील तें येतें तळा । न सुटे तोंवरी येथें गुंतलिया खेळा ॥३॥ सांडितां ठाव पुढें सईल धरी हात । चढेल तो पडेल ऐसी ऐका रे मात ॥४॥ तुका म्हणे किती आवरावे हात पाय । न खेळावें तोंच बरें वरी न ये डाय ॥५॥