भजनी मालिका
← भजनांकडे परत

अद्वय चिद्वय झालें चि कारण । धरिलें नारायणें भक्तिसुख

advay chidvay jhalen chi karan | dharilen narayanen bhaktisukh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अद्वय चिद्वय झालें चि कारण । धरिलें नारायणें भक्तिसुख ॥१॥ अपरोक्ष आकार झाला चतुर्भुज । एकतत्व बीज भिन्न नाहीं ॥ध्रु.॥ शून्य निरसुनी राहिलें निर्मळ । तें दिसे केवळ विटेवरी ॥२॥ सुखें घ्यावें नाम वदनाही वाड । सरिता वापी आड एक पाणी ॥३॥ तुका म्हणे मी च आहें तेणें सुखें । भेद नाहीं मुखें नाम गाता ॥४॥