भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें

santanchin uchchhishten bolaton uttaren | kay myan gavharen janaven hen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें ॥१॥ विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ध्रु.॥ करितो कवित्व बोबडा उत्तरी । झणी मजवरी कोप धरा ॥२॥ काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नेणें ॥३॥ तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तोचि जाणे ॥४॥