भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो

santansi ton nahin sanmanachi chad | pari pade dvad avherito

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥१॥ म्हणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु.॥ भावहीना आड येतसे आशंका । उचितासी चुका घालावया ॥२॥ तुका म्हणे जया संकोच दर्शनें । तया ठाया जाणें अनुचित ॥३॥