भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचिया पायीं माझा विश्वास । सर्वभावें दास जालों त्यांचा

santanchiya payin majha vishvas | sarvabhaven das jalon tyancha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतांचिया पायीं माझा विश्वास । सर्वभावें दास जालों त्यांचा ॥१॥ ते चि माझें हित करिती सकळ । जेणें हा गोपाळ कृपा करी ॥ध्रु.॥ भागलिया मज वाहतील कडे । त्यांचियाने जोडे सर्व सुख ॥२॥ तुका म्हणे शेष घेईन आवडी । वचन न मोडीं बोलिलों तें ॥३॥