भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतापाशीं बहु असावें मर्यादा । फलकटाचा धंदा उर फोडी

santapashin bahu asaven maryada | phalakatacha dhanda ur phodi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतापाशीं बहु असावें मर्यादा । फलकटाचा धंदा उर फोडी ॥१॥ वासर तो भुंके गाढवाचेपरी । उडे पाठीवरी यम दंड तेणें ॥ध्रु.॥ समयो नेणें तें वेडें चाहाटळ । अवगुणाचा ओंगळ मान पावे ॥२॥ तुका म्हणे काय वांयां चाळवणी । पिटपिटघाणी हागवणेची ॥३॥