भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतांचे घरींचा दास मी कामारी । दारीं परोपरीं लोळतसें

santanche gharincha das mi kamari | darin paroparin lolatasen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतांचे घरींचा दास मी कामारी । दारीं परोपरीं लोळतसें ॥१॥ चरणींचे रज लागती अंगांस । तेण बेताळीस उद्धरती ॥ध्रु.॥ उच्छिष्ट हें जमा करुनि पत्रावळी । घालीन कवळी मुखामाजी ॥२॥ तुका म्हणे मी आणीक विचार । नेणें हे चि सार मानीतसें ॥३॥