भजनी मालिका
← भजनांकडे परत

संताचे उपदेश आमुचे मस्तकीं । नाहीं मृतेलोकीं राहाणेसा

santache upadesh amuche mastakin | nahin mrutelokin rahanesa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संताचे उपदेश आमुचे मस्तकीं । नाहीं मृतेलोकीं राहाणेसा ॥१॥ म्हणऊनि बहु तळमळी चित्त । येई वो धांवत पांडुरंगे ॥ध्रु.॥ उपजली चिंता लागला उसीर । होत नाहीं धीर निढळ वाटे ॥२॥ तुका म्हणे पोटीं रिघालेंसे भय । करूं आतां काय ऐसें जालें ॥३॥