भजनी मालिका

भजने

प्रतिमा देव ऐसा ज्याचा भाव । न करी निर्वाहो अंगो अंगीं ॥१॥ असतां सर्वत्र बाहेरी अंतरीं । संतुष्टा भीतरीं म्हणे देव ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रतिमाचि देवो ऐसा ज्याचा भावो । तो न करी निर्वाहो आम्हांलागीं ॥१॥ असतां सबराभरित बाहेर जो अंतरीं । तो संपुष्टामाझारी म्हणती देवो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रत्यक्ष ती कथा जगासी माउली । विक्रयें करिती वहिली दोषी देखा ॥१॥ आपुली ती माता आपण भोगितां । प्रायश्चित सर्वथा काय द्यावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रत्यक्ष तो विष्णु असे ज्ञानेश्वर उद्धव अवतार नामदेव ॥१॥ निवृत्ती तो हर ब्रह्म तो सोपान। ऐसे अवतार बहुत जाण ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

प्रत्यक्ष देव असोनी नाहीं म्हणती । न कळे मुर्खा देशकपोर्ट धुंडिती ॥१॥ देहींच देहीं देव तो आहे । भ्रांतीचेनी लोभें नाहींसा होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रत्यक्ष्‍ भानुदासाचें कुळीं । स्वयें वनमाळी अवतरले ॥१॥ भक्तीमार्ग लोपे अधर्म संचला । कली उदय झाला प्रथम चरण ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

प्रथम अवतारीं आई थोर ख्याति केलीवो । ब्रम्हयाच्या कैवारा आपण मत्स्यरूप झाली वो । धुंडाळिला सागर आई शंखासुरा मिठी घाली वो । वधियले राक्षस ब्रम्हपुरीं त्वां स्थापिलें वो ॥१॥

रचनाकार: संत नामदेव

प्रथम अवतारीं देव मच्च झाले सागरीं । वधोनि शंखा-सुर वैरी आणिले वेद ॥१॥ कूर्म अवतारी सांवरीली सृष्टी । वरा-हद्विज नेहटी धरणीधरु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रथम मत्स्यावतारीं तुमचें अगाध चरित्र । न कळे ब्रह्मादिकां वैष्णव गाती पवित्र ॥१॥ उठोनि प्रातःकाळीं गौळणीं घुसळन घुसळिती । गाती कृष्णाचे पोवाडे हृदयीं परोपरी ध्याती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रपंच आमिष गुंतशील गळीं । शेवटीं तळमळी होइल रया ॥१॥ स्त्री पुत्र धन हें केवळ जाळें । गुंतशील बळे यांत रया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रपंच घडामोडी न सरे कल्पकोडी । वासनेची बेडी पडाली पाथीं ॥१॥ सोडवण करा आलेनो संसारा । शरण जा उदारा विछोबासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रपंच परमार्थ एकरुप होत । आहे ज्याचा हेत रामनामीं ॥१॥ परमर्थे साधें सहज संसार । येथेंक वेरझार नाहीं जना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ