भजनी मालिका

भजने

अकळ तो खेळ नाकळे वेदांतीं । वाउलें कुंथती भारवाही ॥१॥ ऐसा तो अकळ न कळेची कळा । लावियेला चाळा सर्व जीवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अकस्मात तेथें उठली ते वाणी । नका भिऊं म्ह-णोनि मेघरूपा ॥१॥ ऐकतांचि कानीं हरुषले मनीं । देवाचिया श्रेणी नामा म्हणे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अकार उकार मकार नामचि ठेविलें । शिवतेंहि केलें निराकार ॥१॥ जीव शिव दोन्हीं विराले ज्यामाजीं । ते नाम सहजीं विठ्ठल होय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अकार उकार मकार योगीयांची स्थिती । हे प्रकाशज्योति विटेवरी ॥१॥ सबाह्म परिपुर्न भरुनी उरलें । अलक्ष्य तें जाहलें लाक्ष्याकार ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अकार उकार मकारां वेगळां । परब्रह्मा पुतळा शिव एक ॥१॥ अंडज जारज स्वदेज उद्भिजां वेगळा । परब्रह्मा पुतळा शिव एक ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अकार उकार मकारांपरता सर्वेश्वर । कटीं धरुनी कर उभा विटे ॥१॥ नीरा भीवरा संगम पुंडलीक मुनी । नारद वेणुनाद ऐसेंस्थळ लक्षुनी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अकार तो अकारु मकार तो मकारु । उकाराचा पालाऊ शोभे गे माय ॥१॥ आदि अंत नसे ज्या रुपा वेगळें । तें कैसें वोळलें पुंडलिका गे माय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अंकावरी घेउनी खेळवी नानापरी । मोहाची तो थोरी ऐशी आहे ॥१॥ वडील ती स्त्री येऊनियां पाहे । राजअंकी आहे कोण बाळ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अंकित अंकिला भक्तांचा कैवारी । वेद निरंतरी वाखाणिता ॥१॥ तें रुप गोजिरें सांवळें साजिरें । उभे तें भीवरे पैलथडीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अंकिला देव संतद्वारीं । भिक्षा मागें तो निर्धारीं ॥१॥ मज द्याहो प्रेमभिक्षा । देव बोले तया प्रत्यक्षा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अक्रुराच्या घरा आले रामकृष्ण । संतोषलें मन फार त्याचें ॥१॥ घालेनि आसन प्रक्षाळी चरण । ह्मणे धन्य दीन आजीचा हा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव