भजनी मालिका
← भजनांकडे परत

अकार उकार मकारां वेगळां । परब्रह्मा पुतळा शिव एक

akar ukar makaran vegalan | parabrahma putala shiv ek

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अकार उकार मकारां वेगळां । परब्रह्मा पुतळा शिव एक ॥१॥ अंडज जारज स्वदेज उद्भिजां वेगळा । परब्रह्मा पुतळा शिव एक ॥२॥ प्राण अपान व्यान उदान समान । यांवेगळा जाण शिव एक ॥३॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश । यांवेगळा भास शिव एक ॥४॥ द्वैता अद्वैता वेगळांचि जाण । एका जनार्दनीं पूर्ण शिव एक ॥५॥