भजनी मालिका
← भजनांकडे परत

ॐ कार हा वर्ण नामाचें पैं मूळ । परब्रह्मा केवळ रामनाम

om kar ha varna namachen pain mul | parabrahma keval ramanam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ॐ कार हा वर्ण नामाचें पैं मूळ । परब्रह्मा केवळ रामनाम ॥१॥ रामकृष्ण हरी गोविंदा गोपाळा । आठवा वेळोवेळां अहो जन ॥२॥ एका जनार्दनीं वदतां वैखरीं । देखे चराचरीं परब्रह्मा ॥३॥