भजनी मालिका
← भजनांकडे परत

ॐ कारा परतें निर्गुणा आरुतें । भक्तांसी निरुतें गोकुळीं वसे

om kara paraten nirguna aruten | bhaktansi niruten gokulin vase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
ॐ कारा परतें निर्गुणा आरुतें । भक्तांसी निरुतें गोकुळीं वसे ॥१॥ सांवळें सगुन चैतन्य परिपुर्ण । संवगदियासी जाण क्रीडा करी ॥२॥ आदि मध्य अंत न कळे ज्या रुपाचा । तोचि बाळ नंदाचा म्हणताती ॥३॥ एका जनार्दनीं वेगळाचि पाहीं । हृदयीं धरुनी राही सांवळियासी ॥४॥