भजनी मालिका

भजने

अंगी ऐश्वर्य येऊनि बाणें । तुमचे भक्तींचीं लक्षणें ॥१॥ तैं तो मान्य होय जगीं । विश्व वंदी तयालागीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अंगीं घेऊनियां वारें दया देती । तया भक्ता हातीं चोट आहे ॥१॥ देव्हारा बैसोनि हालविती सुपें । ऐसीं पापी पापें लिंपताती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अंगीं जया पुर्ण शांती । वाचा रामनाम वदती । अनुसरले चित्तवृत्तीं । संतचरणीं सर्वदा ॥१॥ घडो तयांचा मज संग । जन्ममरणाचा फिटतसे पांग । आधिव्याधि निरसोनी सांग । घडतां संग वैष्णवांचा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

अंगीं देवी खेळे । कां रे तुम्हासी न कळे । कोणाचे हे चाळे । सुख दुःख न मनितां ॥१॥ मीं तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं । पालटाचा घेई । भाव खरें लोपे ना ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अंगीं ब्रम्हक्रिया खिस्तीचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळाचे ॥१॥ आंतेजा खिचडी घेताती मागून । गाळिप्रधानि मायबहिणी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अंगीकार ज्याचा केला नारायणें । निंद्य तें हि तेणें वंद्य केलें ॥१॥ अजामेळ भिल्ली तारीली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य केली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अगे तूं माउली संतांची साउली । आठवितां घाली प्रेमपान्हा ॥१॥ प्रेमपान्हा पाजी अगे माझे आई । विठाई गे मायी वोरसोनी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अंगे येऊनियां रामें नवल पैं केलें भवाब्धी बांधिली सेतु । अतिशयेसी जड दगड तैसें मुढ नामेंचि तारितु । अविश्वासिया तेथे मार्गचि न कळे स्वेतबंधीं भवें आवर्तु रया ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

अगोचरी बोलिलों आज्ञेविण आगळें । परी तें आतां न संडावें कृपाळू राउळें ॥१॥ जाईल रोकडा बोल न पुसती आम्हां । तुझा तुझें म्हणविलें पाहा पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

अंगोळिये विठा कडियेसी नारा । राजाई पंढरपुरा चालियेली ॥१॥ भिवरा संपूर्ण जातसे भरयेली । राजाई बोलली कैसें जालें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

अंगोळिये विठा कडियेसी नारा। राजाई पंढरपुरा चालिबेली।।१।। भिवरा संपूर्ण जातसे भरवेली। राजाई बोलली कैसें जालें ॥२॥

रचनाकार: संत राजाई

“अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हादु। हृदयी गोविंदु म्हणोनिया॥ अग्नि जाळी तरी न जळती गोपाळू। हृदयी देवकीबाळू म्हणोनिया॥

रचनाकार: संत जगमित्र

अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हादु। हृदयी गोविंदु म्हणोनिया॥ १॥ आग्नि जाळी तरी न जळे गोपाळु । हृदयी देवकी बाळू म्हणोनिया॥ २॥

रचनाकार: संत जगमित्र