भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगी देखोनियां सती । अंगीं रोमांच उठती

agi dekhoniyan sati | angin romanch uthati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अगी देखोनियां सती । अंगीं रोमांच उठती ॥१॥ हा तो नव्हे उपदेश । सुख अंतरीं उल्हासे ॥ध्रु.॥ वित्तगोतांकडे । चित्त न घाली न रडे ॥२॥ आठवूनि एका । उडी घाली ह्मणे तुका ॥३॥