भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगीं ब्रम्हक्रिया खिस्तीचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळाचे

angin bramhakriya khisticha vyapar | hinde gharoghar chandalache

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
अंगीं ब्रम्हक्रिया खिस्तीचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळाचे ॥१॥ आंतेजा खिचडी घेताती मागून । गाळिप्रधानि मायबहिणी ॥ध्रु.॥ उत्तमकुळीं जन्म क्रिया अमंगळ । बुडविलें कुळ उभयतां ॥२॥ तुका म्हणे ऐसी कलयुगाची चाली । स्वार्थे बुडविलीं आचरणें ॥३॥