भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंगी ऐश्वर्य येऊनि बाणें । तुमचे भक्तींचीं लक्षणें

angi aishvarya yeuni banen | tumache bhaktinchin lakshanen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अंगी ऐश्वर्य येऊनि बाणें । तुमचे भक्तींचीं लक्षणें ॥१॥ तैं तो मान्य होय जगीं । विश्व वंदी तयालागीं ॥२॥ शांती क्षमा आलिया वस्ती । संतलक्षणाची प्रशस्ती ॥३॥ कामक्रोधामोडली चाली । सर्व भूतीं साम्यता झाली ॥४॥ तुटोन गेले आशापाश । नुरोनि कल्पना नि:शेष ॥५॥ निळा म्हणे नाहीं ममता । कृपा तुमची ते अनंता ॥६॥