भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंड भूतदया मानसीं । वाचे नाम अहर्निशी । तया न बिसबे हषिकेशी । मागें मागें हिंडतसे

akhand bhutadaya manasin | vache nam aharnishi | taya na bisabe hashikeshi | magen magen hindatase

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अखंड भूतदया मानसीं । वाचे नाम अहर्निशी । तया न बिसबे हषिकेशी । मागें मागें हिंडतसे ॥१॥ जिहीं परकारणीं वेंचिलें । शरीर आयुष्य आपुलें । धन वित्तही वंचिले । तयां विठठलें सन्मानिजे ॥२॥ जिहीं गाईलें नित्य नाम । अंतरीं धरुनियां प्रेम । तया वस्तिसी निजधाम । निर्मूनियां ठेविलें ॥३॥ जिहीं धरिला संतसंग । दुराविलें त्रिविध जग । तया सखा पांडुरंग । निजानुभवें जोडला ॥४॥ निळा म्हणे सद्गुरु भक्ति । दास्य ब्राम्हणांचे अनुरक्ती । तयालागीं हा श्रीपती । करी सांगाती आपुला ॥५॥