भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगा ये षड्गुण भाग्यवंता

aga ye shadgun bhagyavanta

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अगा ये षड्गुण भाग्यवंता । समग्र लक्ष्मीचिया कांता । समग्र यशातें तूं धरिता । समग्र ऐश्रवर्यता तुज अंगी ॥१॥ समग्र औदार्यलक्षणीं । समग्र वैराग्याची खाणी । मग्र ज्ञानशिरोमणी । समग्र षड्गुणी संपन्ना ॥२॥ यशें थोरविला मारुति । विभीषण केला लंकापती । औदार्य देऊनी कर्णा हाती । कीर्ति दिगंती फाकविली ॥३॥ ज्ञानें उपदेशिला चतुरानन । ऐश्वर्य वाढविला अर्जुन । वैराग्यशुकार्ते बोधून । ब्रम्ह सनातन पावविला ॥४॥ निळा म्हणे इहीं अगाध लक्षणी । वंद्य सुरासुरां तूं त्रिभुवनी । माझी अलंकारुनियां वाणी । प्रवर्तवावी स्तवनीं आपुलिया ॥५॥