भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंडता ते झाली ऐसी । विठ्ठल राहिला मानसीं । ध्यानीं मनीं लोचनासीं । अहर्निशीं निजबोध

akhandata te jhali aisi | viththal rahila manasin | dhyanin manin lochanasin | aharnishin nijabodh

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अखंडता ते झाली ऐसी । विठ्ठल राहिला मानसीं । ध्यानीं मनीं लोचनासीं । अहर्निशीं निजबोध ॥१॥ जनीं वनीं जनार्दन । नाढळें त्या भिन्नाभिन्न । एकात्मता अनुसंधान । नित्य दर्शन विठठलीं ॥२॥ देहीं असोनी देहातीत । गुणीं गुणातें नातळत । विषयीं विषयापासुनी मुक्त । भोगीं भोगासक्त नव्हती ते ॥३॥ नित्य निरामय निर्गुण । जगादात्मा जो आनंदघन । विटेवर पाउलें समान । लोधलें मन चरणीं त्या ॥४॥ निळा म्हणे विठ्ठल जपें । सांडिले ते पुण्यपापें । संकल्प सोडिले विकल्पें । त्रिविधतापें स्वानुभवी ॥५॥