भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रत्यक्ष ती कथा जगासी माउली । विक्रयें करिती वहिली दोषी देखा

pratyaksha ti katha jagasi mauli | vikrayen kariti vahili doshi dekha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रत्यक्ष ती कथा जगासी माउली । विक्रयें करिती वहिली दोषी देखा ॥१॥ आपुली ती माता आपण भोगितां । प्रायश्चित सर्वथा काय द्यावें ॥२॥ पतिव्रतेनें जैसा पतीच वधिला । प्रायश्चित्त तिला कोणी द्यावें ॥३॥ मातें बाळकासी विषपान दिलें । प्रायश्चित या बोले कोणीं द्यावें ॥४॥ एका जनार्दनीं कथा ती माउली । विकितां घडली ब्रह्माहत्या ॥५॥