भजनी मालिका

भजने

प्रपंच परमार्थ करीं कां रे सुखाचा । निरंतर वाचा निवृत्तिनाम ॥१॥ तुटेल बंधन खुंटेल पतन । निवृत्तिनाम जाण जपतांचि ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही । एक ही निदानीं न घडे त्यासी ॥१॥ दोहीं पेंवावरी ठेवूं जातां हात । शेवटीं अपघात शरीराचा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

प्रपंच स्वार्थासि साधावया चांग । वैराग्याचें अंग दाविसी जना ॥१॥ अनुताप नित्य नाहीं कदाकाळीं । मग संचि-ताची होळी कैसी होय ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रपंचरचना सर्वहि भोगुनि त्यागीली । अनुतापाचे ज्वाळीं देहबुध्दी हविली । वैराग्याची निष्ठा प्रगटूनि दाखविली । अहंता ममता दवडुनि निजशांति वरिली ॥१॥ जयजयाजी सदगुरुतुकया दातारा । तारक तूं सकळांचा जिवलग सोयरा ॥ध्रु॥ हरिभक्तिचा महिमा विशेष वाढविला । विरक्तिज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला । जगदोध्दारालागीं उपाय सुचविला । निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला ॥जय ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

प्रपंचाचा भाव वाहतसे खर । न कळे विचार साधनांचा ॥१॥ गुंतलासे मीन गळाचिये परी । अमीष देखोनी वरी गिळितसे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रभातेसी उठोनी । स्नान करिती अनुदिनीं । विठ्ठल दरुशनीं । प्राणी मुक्त संसार ॥१॥ धन्य पंढरीचा वास । सुख मिळे अविनाश । कुळीं वैष्णव निःशेष । रामकृष्ण उच्चार ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रभासादि क्षेत्रें सप्तपुर्‍या असती । परी सरी न पावती पंढरीची ॥१॥ दरुशनें चित्त निवे पाहतां बरवें । शंख चक्र मिरवे चहुं करीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ