भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंच स्वार्थासि साधावया चांग । वैराग्याचें अंग दाविसी जना

prapanch svarthasi sadhavaya chang | vairagyachen ang davisi jana

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रपंच स्वार्थासि साधावया चांग । वैराग्याचें अंग दाविसी जना ॥१॥ अनुताप नित्य नाहीं कदाकाळीं । मग संचि-ताची होळी कैसी होय ॥२॥ पवित्र ते वाचा कांरे गमाविसी । रामनाम न ह्मणसी अरे मूढा ॥३॥ नामा ह्मणे जीव कासया ठेवावा । न भजतां केशवा मायबापा ॥४॥