भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंचाचा कठिण लाग । नाशासी मूळ स्त्रीसंग

prapanchacha kathin lag | nashasi mul strisang

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रपंचाचा कठिण लाग । नाशासी मूळ स्त्रीसंग ॥१॥ भोगाचे जें जें सुख । तें तें प्रत्यक्ष घेतो विख ॥२॥ दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥३॥ पुढील निमाले देखती । पाहुनी पुढे उडी घालिती ॥४॥ ऐसे भुलले तया संगीं । एका जनार्दनीं जगीं ॥५॥