भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रभासादि क्षेत्रें सप्तपुर्‍या असती । परी सरी न पावती पंढरीची

prabhasadi kshetren saptapur‍ya asati | pari sari na pavati pandharichi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रभासादि क्षेत्रें सप्तपुर्‍या असती । परी सरी न पावती पंढरीची ॥१॥ दरुशनें चित्त निवे पाहतां बरवें । शंख चक्र मिरवे चहुं करीं ॥२॥ पीतांबर परिधान वैजयंती माळा । शोभे सोनसळा अंगावरी ॥३॥ एका जनार्दनीं पाहतां रुपडें । उभें तें उघडें विटेवरी ॥४॥