भजनी मालिका

भजने

प्राणियां उद्धार नाम मुखीं गातां । येरा तें करितां वायां जाय ॥१॥ पालथी घागरी घालितां वाउगी । नामाविण जगीं शीण तैसा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्राणियां एक बीजमंत्र उच्चारीं । प्रतिदिनीं रामकृष्ण म्हणे कां मुरारि ॥१॥ हें चि साधन रे तुज सर्व सिद्धींचे । नाम उच्चारीं पां गोपाळाचें वाचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

प्राणीमात्र पर्वतातळीं । राहिले ते निजानंद मेळीं । नित्य हरिकीर्तीची नव्हाळी । श्रवण मनन करिताती ॥१॥ सप्तअहोरात्रीवरि । पर्जन्यवृष्टी केली भारी । विजुवा कडाडिती गगनोदरीं । तेणे ब्रम्हांड फुटों पाहे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

प्रात: काळीं मुलें येताती सकळ । उठवीं गोपाळ ह्मण-ताती ॥१॥ आळस देवोनी उठे देवराणा । बळिराम गोधना सोडी-तसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रात:काळ जाहला मिळाल्या नायका । उष्णोदकें देखा अभ्यंगिती ॥१॥ सोळा सहस्त्र शत अष्ट त्या नाइका । विनोद तो देखा मेहुणपणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रात:काळ झालिया पाहती नरनारी । नोवरा आणि नोवरी व्याहीही ना ॥१॥ विठ्ठलशेटी नाहीं परिवारासहित । राजाई मनांत शोक करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रात:काळीं उद्धव स्रानासी चालिला । मिळालासे मेळा गोपिकांचा ॥१॥ परस्परें ह्मणती कोण आतां आला । न्यावया नंदाला पाठविलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रात:काळीं गडी उठे कृष्णराम । पाहावया ग्राम चालियेले ॥१॥ मागती रजका देईना तो वस्त्रें । वधी नख शस्त्रें पापियासी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रात:काळीं प्रहार रात्रीं गोणी बाळा । घुसळण मांडियेलें घरोघरीं सकळां । नित्यानंदें परमानंदें गाती गोपाळा । सह्स्रापरी कैशा गाती मदन सांवळा ॥१॥ घुम घुम करिती घुम घुम करिती डेरे घुमती । आनंदल्या गौळणी छंदें छंदें डोलती ॥ध्रु०॥

रचनाकार: संत नामदेव

प्रात:काळीं मात झाली गोकुळांत । जातो भगवंत मथुरेसी ॥१॥ गौळणींचा मेळा मिळाला सकळ । पिटिती कपाळ आपुले हातें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रात:काळीं राधा उठोनियां जाण । नंदसदनावरून पाण्या जात ॥१॥ इकडे गोदोहन करीतसे हरी । पाहे उभी द्वारी राधिका ते ॥२॥

रचनाकार: संत नामदेव