भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रात:काळीं गडी उठे कृष्णराम । पाहावया ग्राम चालियेले

prat:kalin gadi uthe krushnaram | pahavaya gram chaliyele

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रात:काळीं गडी उठे कृष्णराम । पाहावया ग्राम चालियेले ॥१॥ मागती रजका देईना तो वस्त्रें । वधी नख शस्त्रें पापियासी ॥२॥ ती ठायीं वांकडी नीट केली तीसी । तीनें चंद-नासी लवियेलें ॥३॥ जोडोनियां हात विनवी सुदामा । चला मेघ:-शामा घरा माझ्या ॥४॥ वस्त्रें देती तेव्हां मथुरेचे लोक । नरनारी मुख पाहाताती ॥५॥ मोडितां धनुष्य येती रक्षपाळ । नामा ह्मणे खळ वधियेले ॥६॥