भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रात:काळ जाहला मिळाल्या नायका । उष्णोदकें देखा अभ्यंगिती

prat:kal jahala milalya nayaka | ushnodaken dekha abhyangiti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रात:काळ जाहला मिळाल्या नायका । उष्णोदकें देखा अभ्यंगिती ॥१॥ सोळा सहस्त्र शत अष्ट त्या नाइका । विनोद तो देखा मेहुणपणें ॥२॥ घालूनियाम स्नान वस्त्र अलंकार देती । भोजन सारिती यादवपंक्ती ॥३॥ एका जनार्दनीं बैसले निवांत । मग कृष्णनाथ काय बोले ॥४॥