भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रात:काळीं उद्धव स्रानासी चालिला । मिळालासे मेळा गोपिकांचा

prat:kalin uddhav sranasi chalila | milalase mela gopikancha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रात:काळीं उद्धव स्रानासी चालिला । मिळालासे मेळा गोपिकांचा ॥१॥ परस्परें ह्मणती कोण आतां आला । न्यावया नंदाला पाठविलें ॥२॥ सकळांच्या प्राणा घेऊनियां येईं । ह्मणोनियां पाहीं धाडी यासी ॥३॥ भ्रमरासी स्रिया कुशब्दें ताडिती । आव-डीनें बोलती नाना शब्द ॥४॥ धावून उद्धवाचे धरीती चरण । आमुचें स्मरण करितसे ॥५॥ स्वरूपहीन आम्ही सुंदर कंसदासी । ह्मणोनि तुजसी पुसतसों ॥६॥ आह्मांसाठीं तेथें जाऊनियां ह्मणे । एकदां चरण दावी सर्वां ॥७॥ गेल्या गोपिका त्यांची राख झाली । वाजवी मुरली तया जागा ॥८॥ नामा ह्मणे त्यांसीं सांगे ब्रह्मज्ञान । श्रीकृष्ण कृपेनें स्थिरावल्या ॥९॥