भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्राणियां एक बीजमंत्र उच्चारीं । प्रतिदिनीं रामकृष्ण म्हणे कां मुरारि

praniyan ek bijamantra uchcharin | pratidinin ramakrushna mhane kan murari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्राणियां एक बीजमंत्र उच्चारीं । प्रतिदिनीं रामकृष्ण म्हणे कां मुरारि ॥१॥ हें चि साधन रे तुज सर्व सिद्धींचे । नाम उच्चारीं पां गोपाळाचें वाचे ॥ध्रु.॥ उपास पारणें न लगे वनसेवन । न लगे धूम्रपान पंचाअग्नतापन ॥२॥ फुकाचें सुखाचें कांहीं न वेचें भांडार । कोटीयज्ञांपरिस तुका म्हणे हें सार ॥३॥