भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्राणिया उद्धार सर्व हा श्रीधर

praniya uddhar sarva ha shridhar

प्राणिया उद्धार सर्व हा श्रीधर । ब्रह्म हें साचार कृष्णमूर्तीं ॥१ ॥ तें रूप भीवरें पांडुरंग खरें । पुंडलिकनिर्धारें उभे असें ॥ २ ॥ युगे अठ्ठावीस उभा ह्रषीकेश । पुंडलिका सौरस पुरवित ॥ ३ ॥ निवृत्तीचें गुज पांडुरंगाबीज । विश्वजनकाज पुरे कोडें ॥ ४ ॥