भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंधारिये रातीं उगवे हा गभस्ति

andhariye ratin ugave ha gabhasti

अंधारिये रातीं उगवे हा गभस्ति । मालवे ना दीप्ति गुरुकृपा ॥ १ ॥ तो हा कृष्ण हरि गोकुळामाझारी । हाचि चराचरीं प्रकाशला ॥ २ ॥ आदि मध्य अंत तिन्ही जाली शून्य । तो कृष्णनिधान गोपवेषे ॥ ३ ॥ निवृत्तिनिकट कृष्णनामपाठ । आवडी वैकुंठ वसिन्नले ॥ ४ ॥