भजनी मालिका
← भजनांकडे परत

अद्वैत अमरकंदु हा घडला

advait amarakandu ha ghadala

अद्वैत अमरकंदु हा घडला । ब्रह्मांडी संचला ब्रह्मासाचें ॥१॥ तें रूप कारण कृष्ण तेजाकार । सर्व हा आकार त्याचा असे ॥२॥ विराट विनटु विराट दिसतु । आपणचि होतु ब्रह्मसुख ॥३॥ निवृत्ति कोवळें आपण सोंविळें । त्यामाजी वोविलें मन माझें ॥४॥