भजनी मालिका
← भजनांकडे परत

अकर्ता पैं कर्ता नाही यासी सत्ता

akarta pain karta nahi yasi satta

अकर्ता पैं कर्ता नाही यासी सत्ता । आपण तत्वता स्वयें असे ॥ १ ॥ तें रूप चोखाळ कृष्णनामें बिंबे । यशोदा सुलभें गीतीं गाय ॥ २ ॥ व्योमाकार ठसा नभीं दशदिशा । त्यामाजि आकाशा अवकाश होय ॥ ३ ॥ निवृत्ति म्हणे गुरु माझा पूर्ण ब्रह्म । उपदेश सुगम कृष्णनाम ॥ ४ ॥