भजनी मालिका

भजने

प्रमाण हें त्याच्या बोला । देव भक्तांचा अंकिला॥१॥ न पुसतां जातां नये । खालीं बैसतां ही भिये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

प्रयागादि क्षेत्रें आहेत कल्पकोडी । तया आहे खोडी एक एक ॥१॥ मुंडन ती काया निराहार राहणें । येथेम न मुंडणें काया कांहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रयागादि तीर्थे आहेत समर्थ । परी पुरती मनोरथ पंढरीये ॥१॥ बहुत ते साक्ष देती या स्थळासी । सदा तो मनासी शिव ध्याये ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रर्‍हाद नारद पराशर पुंडरीक । व्यास आणि वा-ल्मिक नमीयले ॥१॥ दालभ्य तो भीष्म अंबरीष शौनक । ब्रह्मनिष्ठ शूक नमीयले ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रर्‍हाद रक्षिलें पांडवां प्रतिपाळिलें । तया उभें केलें पुंडलिकें ॥१॥ बिभिषणा स्थापिलें ध्रुवासी अढळ केलें । तया उभें केलें पुंडलीकें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार । भक्त राजेश्वर ह्मण-ताती ॥१॥ जळीं स्थळीं आहे सर्वां ठायीं हरी । प्रत्यक्ष तूं न्या-हारी स्तंभामाजी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रल्हादादिकांचें अंतरीचें ध्यान । तें पंढरीये निधान उभें असे ॥१॥ सर्व जन जया नेणते जाहले । सुख दाखविलें पुंडलीका ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रळयाचे ळाळीं ब्रह्मांड जळालें । कोण त्यांत उरलें सांगा मज ॥१॥ प्रभा ते फांकली जाती ते गुंतली । सांग मज खोली स्वरूपाची ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रवृत्तिनिवृत्तीचे आटुनिया भाग । उतरिलें चांग रसायण ॥१॥ ज्ञानाग्रीहुतासी कडशिलें वोजा । आत्मसिध्दीकाजा लागोनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

प्रवृत्तिनिवृत्तीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसायण ॥१॥ ज्ञानाग्निहुताशीं कडशिले वोज । आत्मसिद्धिकाजा लागूनियां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

प्रसन्न वदन सदा विळ आहे । कां करिसी उपाव कर्म जाड ॥१॥ मंत्रांचा पैं मंत्र बीज नाम हरीचें । तेंचि हें शिवाचें रामनाम ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रसा भागवतें केला नमस्कार । सारे लहान थोर जमा जाले ॥१॥ सकलांचिया पायीं नमियलें नमना । केली प्रदक्षिणा समाधीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रसाद तुमचा लाधलों आतां । झालों कृतकृत्यता सनाथ ॥१॥ पुरविला जीवींचा हेत । होतो चिंतीत मानसीं तो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

प्राक्तनाच्या योगें आळशावरी गंगा । स्नान काय जगा करूं नये ॥१॥ उभी कामधेनु मागिलें अंगणीं । तिसी काय ब्राम्हणीं वंदूं नये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम