भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रर्‍हाद नारद पराशर पुंडरीक । व्यास आणि वा-ल्मिक नमीयले

prar‍had narad parashar pundarik | vyas ani va-lmik namiyale

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रर्‍हाद नारद पराशर पुंडरीक । व्यास आणि वा-ल्मिक नमीयले ॥१॥ दालभ्य तो भीष्म अंबरीष शौनक । ब्रह्मनिष्ठ शूक नमीयले ॥२॥ रुक्मांगद अर्जुन वसिष्ठ बिभीषण । केलेंसे नमन याजलागीं ॥३॥ टीकाकार श्रीधर बहिरंभट चतुर । करा नि-रतंर कृपा मज ॥४॥ साधुसंतसिद्ध शिरीं ठेवा हात । वर्णींन स-मस्त कृष्णलीला ॥५॥ नामा मनीं आठवी खेचरचरण । तयाच्या कृपेनें सिद्धि जावो ॥६॥